BEED24

अबब… गांधीजींच्या चष्म्याला अडीच कोटी!

इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेत असताना महात्मा गांधींनी वापरलेल्या सोन्याच्या कडा असलेल्या चष्म्यांचा शुक्रवारी दि.२१ आगस्ट रोजी युकेमध्ये लिलाव झाला. या लिलावात या चष्म्यांना तब्बल अडीच कोटी रुपये (२,६०.००० पौंड)  किंमत मिळाली. चार आठवड्यांपूर्वीच चष्म्यांची ही जोडी एका लिलाव कंपनीच्या टपाल पेटीत आढळून आली होती. बीबीसीने याबाबत वृत्त दिलं आहे.

एका जुन्या वस्तू जमवण्याचा छंद असणाऱ्या अमेरिकन व्यक्तीने  हे चष्मे केवळ सहा मिनिटात विकत घेतले आहेत. याबाबत माहिती देताना ईस्ट ब्रिस्टॉल ऑक्शन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या टपाल पेटीत एका व्यक्तीने एका चिठ्ठीसह हे चष्मे टाकले होते. यातील चिठ्ठीत त्यानं म्हटलं होतं की, स्वतः गांधीजींनी त्यांच्या काकांना सन १९२० मध्ये दक्षिण अफ्रिकेत असताना हे चष्मे भेट दिले होते.   हे चष्मे साधारण १५,००० पौंड अर्थात १४ लाख रुपयांपर्यंत विकले जातील असा अंदाज कंपनीचा होता. मात्र ते अपेक्षेपेक्षा २० पट जास्त किंमतींना म्हणजेच अडीच कोटी रुपयांना विकले गेले.
गांधींजी जेव्हा सन १८००च्या शेवटी इंग्लंडमध्ये कायद्याचं शिक्षण घेत होते. त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीतही गांधीजींनी अशाच प्रकारचे चष्मे वापरले. त्यामुळेच गोल काचांचा चष्मा हा आजही गांधीजींची ओळखच बनला आहे. भारतात आजही स्वच्छ भारत अभियानात अशाच गोल चष्म्याचा ब्रँड म्हणून वापर केला जातो.

Exit mobile version