BEED24

आज कमी स्वॅब असताना आले इतके पॉझिटीव्ह….

किल्लेधारूरः दि.५ सप्टेंबर- काल पाठवलेल्या १० पैकी ५ जनांचे व ॲन्टीजन टेस्टमध्ये ४ असे ९ अहवाल पॉझिटीव्ह आली आहेत. काल पासुन तालुक्याची संख्या अचानक वाढली आहे. आज पुन्हा यात ९ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहना नंतर पत्रकारांनी ॲन्टीजन करण्यास सुरुवात केली.

तालुक्यातून गेल्या ३६ दिवसात कोरोना पॉझिटीव्ह असणारे रुग्ण दररोज आढळून येत आहेत. आज ९ रुग्णांची भर पडली आहे. काल धारुर मधून फक्त १० लोकांचे थ्रोट स्वॅब तपासणीला पाठवण्यात आली होती. यापैकी अर्धे म्हणजेच ५ पॉझिटीव्ह आली आहेत. तर ४ जन ॲन्टीजन टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आढळली आहेत. या ९ पैकी ६ शहराच्या विविध भागातील आहेत. तर इतर रुग्णांत भोपा २ व आसरडोह येथील एक आहे. ॲन्टीजन चाचणीत शहरातील तीन तर आसरडोह येथील एकाचा समावेश आहे.  आज धारुर येथे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकारांशी बोलताना पत्रकारांनी ॲन्टीजन चाचणी करण्याचे आवाहन केले होते. यास प्रतिसाद देत मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन व बीड २४ न्यूजचे संपादक सय्यद शाकेरअली यांनी स्वतःची ॲन्टीजन चाचणी केली आहे. यात निगेटिव्ह आल्यानंतर सर्व पत्रकार मित्रांसह व्यापाऱ्यानीही ॲन्टीजन चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version