किल्लेधारूर दि.७(वार्ताहर) आज धारुर तालुक्यातील ७ लोकांचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई स्वा.रा.ति. प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. लवकरच धारुरहून थेट स्वॅब पाठवण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली.
काल शहरात एक बालक कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने खळबळ माजली होती. कालच्या बाधित कुटूंबातील घेण्यात आलेल्या स्वॅब पैकी एक पॉझिटीव्ह, दोन निगेटिव्ह तर दोन अनिर्णित अहवाल प्राप्त झाले होते. या कुटूंबियातील दोघांचा व अनिर्णित राहिलेले स्वॅब आज घेण्यात येणार आहेत. सदरील कुटूंब होम कोरोंटाईन असल्यामुळे केवळ गल्लीत संचारबंदी लावण्यात आली आहे. आज पाठवण्यात आलेले ७ स्वॅब पैकी सुकळी येथील सहा तर मोहीखेड येथील एक आहेत. आज संध्याकाळी यांचा अहवाल प्राप्त होईल. दररोज घेण्यात आलेल्या स्वॅबची संख्या वाढल्यामुळे शहरात तज्ञ व प्रशिक्षित डॉक्टर कडून लवकरच स्वॅब घेण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे डॉ. सचिन शेकडे यांनी सांगितले.