बीडः दि.१३;आगस्ट- काल पाठवलेल्या ५१ अहवाला पैकी आज पुन्हा शहरातील ३ व गोपाळपुर येथील एक असे ४ जन पॉझिटीव्ह आली आहेत. आरोग्य विभागाच्या पथकाकडून संबंधित रुग्णांच्या सहवासितांचा शोध सुरु करण्यात आला आहे. तर आज येथील कोविड केअर सेंटरमधून ३९ सहवासितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती डॉ. चेतन आदमाने यांनी दिली.
शहरात आज चौदाव्या दिवशीही ४ रुग्णांची भर पडली. ५१ स्वॅब पैकी ४ अहवाल पॉझिटीव्ह आली आहेत. यात १) २७ वर्षीय पुरुष ( बाराभाई गल्ली धारुर शहर रुग्णाचा सहवासीत)
२)१७ वर्षीय पुरुष,(शिक्षक कॉलनी धारुर शहर रुग्णाचा सहवासीत)
३)४९ वर्षीय पुरुष (बाराभाई गल्ली, काशिनाथ चौक धारुर शहर रुग्णाचा सहवासीत)
४)१५ वर्षीय स्त्री (मौजे गोपाळपुर ता.धारुर रुग्णाची सहवासीत)
आज येथील कोविड केअर सेंटरमधून ३९ सहवासितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आली असुन धारुर येथील विलगीकरण कक्षात १३ जनांवर उपचार सुरु असल्याची माहिती डॉ. चेतन आदमाने यांनी दिली.