BEED24

आज धारुरात ३७ निगेटिव्ह; तीन पॉझिटीव्ह

किल्लेधारूरः दि.१७;आगस्ट- काल पाठवलेल्या ४० अहवाला पैकी ३७ जनांचे अहवाल निगेटिव्ह आली आहेत. आज पुन्हा शहरातील २ व कासारी बोडखा येथील १ असे ३ जन पॉझिटीव्ह आली आहेत. यात शहरातील एक आरोग्य कर्मचारी नवीन तर इतर दोन सहवासित आहेत.

शहरात आज १८ व्या दिवशीही २ रुग्णांची भर पडली आहे. तर कासारी बोडखा येथील १ असे ३ सहवासित पॉझिटीव्ह आढळली आहेत. ४० स्वॅब पैकी ३७ अहवाल निगेटिव्ह तर ३ पॉझिटीव्ह आली आहेत. यात १) ४६ वर्षीय पुरुष ( कटघरपुरा, धारुर शहर, सहवासित )
२)५० वर्षीय पुरुष,(केज रोड, धारुर शहर, सहवासित )
३)२५ वर्षीय पुरुष,(कासारी बोडखा, सहवासित)

आरोग्य विभागाच्या वतीने सदरील रुग्णाच्या संपर्काचा शोध सुरु केला आहे. येथील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. रात्री उशिरा बाहेरुन येणाऱ्या पोर्टल वरील नोंदीनुसार संख्येत बदल होवू शकतो.

Exit mobile version