बीडः आज आलेल्या थ्रोट स्वॅब तपासणी अहवालात १५ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली असून जिल्ह्यात सध्या ॲक्टिव केस निरंक असलेल्या केज तालुक्यात दोन रुग्ण आढळून आल्यामुळे केज तालुकाही पॉझिटीव्ह रुग्णाच्या तक्त्यात झळकला आहे.
आज बीड शहरात दहा, केज व गेवराई तालुक्यात प्रत्येकी दोन तर परळीत एक नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. बीड शहरात आढळून आलेले सर्व रुग्ण हे खाजगी रुग्णालयात पॉझिटीव्ह रुग्णाच्या सहवासात आलेले तर गेवराई, परळी व केजचे सर्व रुग्ण नवीन आढळली आहेत. यात गेवराईच्या एका बाधितावर औरंगाबाद येथे उपचार सुरु आहेत. दरम्यान धारुरहून पाठवण्यात आलेले सर्व स्वॅब निगेटिव्ह आली आहेत.