BEED24

आज पुन्हा धारुरात ५ पॉझिटीव्ह; एक नवीन तर ४ सहवासित

किल्लेधारूर दि.१६;आगस्ट- काल पाठवलेल्या २८ अहवाला पैकी आज पुन्हा शहरातील २ व उमरेवाडी येथील ३ असे ५ जन पॉझिटीव्ह आली आहेत. यात शहरात एक नवीन तर इतर चार सहवासित आहेत.

शहरात आज १७ व्या दिवशीही २ रुग्णांची भर पडली आहे. तर उमरेवाडी येथील ३ सहवासित पॉझिटीव्ह आढळली आहेत. २८ स्वॅब पैकी ५ अहवाल पॉझिटीव्ह आली आहेत. यात १) १८ वर्षीय पुरुष ( बाराभाई गल्ली, धारुर शहर, सहवासित )
२)६० वर्षीय महिला (जाधव गल्ली, धारुर शहर, नवीन)
३)२५ वर्षीय पुरुष,(उमरेवाडी, सहवासित)
४)२४ वर्षीय स्त्री,(उमरेवाडी, सहवासित)
५)३ वर्षीय मुलगी(उमरेवाडी, सहवासित)

आरोग्य विभागाच्या वतीने सदरील रुग्णाच्या संपर्काचा शोध सुरु केला आहे. येथील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. रात्री उशिरा बाहेरुन येणाऱ्या पोर्टल वरील नोंदीनुसार संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version