BEED24

आज येणार २० स्वॕबचा अहवाल

किल्लेधारूर दि.७(वार्ताहर) तालुक्यातील आंबेवडगाव येथे एकुण ३ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली असुन आज २० जनांच्या स्वॕबचा अहवाल येणार आहे. दरम्यान आरोग्य विभागाने गावात प्रतिबंधात्मक उपाय सुरु केली आहेत.

आंबेवडगाव या गावात एका ६५ वर्षीय व्यक्तीस कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निदान झाले होते. यानंतर काल पाठवण्यात आलेल्या अहवालात दोन महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. काल रात्री आरोग्य विभागाकडून संबंधित कोरोनाग्रस्त महिलांच्या संपर्कात येणाऱ्याचा सर्वे डॉ.सचिन शेकडे, डॉ. चेतन आदमाने, डॉ. परवेज शेख यांच्या पथकाकडून करण्यात आला. यात आणखी दोन महिला त्यांच्या संपर्कात आल्याचे निष्पन्न झाले. या दोघीना आरोग्य विभागाने गृह विलगीकरणात ठेवले असून पाच दिवसानंतर त्यांचेही स्वॕब घेण्यात येणार आहेत. आज सकाळी २० जनांचे स्वॕब लातुरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेली आहेत. रात्री या स्वॕबचे अहवाल प्राप्त होणार आहेत. कालच्या दोन अप्राप्त अहवालाचे पुन्हा स्वॕब घेण्यात येणार आहेत. आंबेवडगावात आरोग्य विभागाच्या तीन पथकाद्वारे ताप रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत असुन ३६३ कुटूंबातील १५७८ जनांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती डॉ. सचिन शेकडे यांनी दिली.

Exit mobile version