BEED24

आज ३९ स्वॅबची प्रतिक्षा; पाचपर्यंत दोन पॉझिटीव्ह; तालुक्याची शतकी खेळी

किल्लेधारूर दि.२३(वार्ताहर) काल धारुरचे ३९ लोकांचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. आज दुपारीच दोघांना बाधा होवून पॉझिटीव्ह आल्याची माहिती कळाली असुन उर्वरित माहिती रात्री आठ पर्यंत प्राप्त होणार आहे. दरम्यान धारुर तालुक्याची कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या शतक पुर्ण करत १०७ झाली आहे.

सध्या सर्वत्र सण ऊत्सवाचा कळ सुरु आहे. याकाळात कोरोना सोबत जगण्याची कला लोकांनी अवगत केली आहे. दररोज शहर व तालुक्यात रुग्ण आढळून येण्याची शृंखला सुरुच आहे. काल येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत ३९ लोकांचे स्वॅब पाठवण्यात आले आहेत. या स्वॅबचे अहवाल रात्री प्राप्त होणार आहेत. आज दुपारपर्यत या अहवालापैकी दोन जन पॉझिटीव्ह आढळून आली होती. शहरात एक व मैंदवाडीतील एकाचा समावेश आहे. दरम्यान तालुक्याची कोरोना रुग्णांची संख्या शतकीपार होवून १०७ झाली आहे.

Exit mobile version