किल्लेधारूर दि.१४(वार्ताहर) काल ३९ लोकांचे थ्रोट स्वॅब येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आली असुन आज रात्री त्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे.
शहरात गेल्या तेरा दिवसांपासून दररोज पॉझिटीव्ह रुग्ण सापडत आहेत. काल येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत ३९ लोकांचे स्वॅब पाठवण्यात आले आहेत. या स्वॅबचे अहवाल आज रात्री प्राप्त होणार आहेत. जिल्ह्यात सध्या कोरोनाचे उग्र रुप दिसुन येत आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २३१९ रुग्णांची नोंद झाली आहे. यातून ९६५ कोरोनामुक्त झाली तर १२९२ जन उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्याही ६२ झाली आहे. आज ४४ स्वॅब पाठवण्यात आली असुन विलगीकरण कक्षात १९ जन उपचार घेत आहेत.