BEED24

आज ६१ स्वॅब अहवालाची प्रतिक्षा;

किल्लेधारूर दि.२२(वार्ताहर) काल धारुरचे ६१ लोकांचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. आज रात्री त्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे.

शहरात वाढत असलेली रुग्ण संख्या पाहता गेल्या दोनतीन दिवसातं जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या सुचनेवरुन येथील सर्व पोलिसांची ॲन्टीजन टेस्ट करण्यात आल्या. याशिवाय शहरातील मुर्ती विक्रेत्यांच्या व काही व्यापाऱ्यांचीही ॲन्टीजन तपासणी करण्यात आली. यात एक होमगार्ड शिपाई पॉझिटीव्ह आढळून आला होता. काल येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत ६१ लोकांचे स्वॅब पाठवण्यात आले आहेत. यात जवळपास २० अंजनडोह येथील बाधित व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातील आहेत. या स्वॅबचे अहवाल आज रात्री प्राप्त होणार आहेत. दरम्यान आज गणेश प्रतिष्ठापणे वर कोरोनाचा प्रभाव दिसुन आला.

Exit mobile version