BEED24

आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासन व पत्रकारांना एन ९५ मास्क व सॅनिटायझर वितरण

किल्लेधारूर दि.२१ (वार्ताहर ) कोरोना प्रादूर्भाव रोकण्या साठी सतत मेहनत घेणारे आरोग्य अधिकारी, कर्मचारी, महसूल विभाग, पोलीस प्रशासन व पत्रकारांना मानवलोक या अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यात अग्रभागी असलेल्या संस्थेचे कार्यवाहक अनिकेत लोहिया यांनी एन ९५ मास्कचे वितरण केले तर आरोग्य विभागाला मास्कसह सॅनिटायझर वाटप केले.

किल्लेधारूर शहर व परीसरात कोरोना व्हायरस चा प्रादूर्भाव रोकण्यासाठी व सर्वसामान्याचे रक्षण करण्यासाठी अग्रेसर राहून जनजागृती व प्रत्यक्ष काम करणाऱ्या शहरातील आरोग्य विभाग, महसूल प्रशासन, व पञकार बांधवासह सामान्य जनतेच्या   रक्षणा साठी रस्त्यावर उभे राहून परीश्रम घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना  येथील सामाजिक कार्य मध्ये अग्रेसर असणाऱ्या  मानवलोक अंबाजोगाई चे कार्यवाहक अनिकेत लोहिया यांनी स्वतः  एन ९५ मास्क चे वितरण केले तर आरोग्य विभागाला दि.२० सोमवार रोजी सॅनिटायझर दिले. मानवलोकच्या वतीने तालुक्यात यापुर्वीही अनेक सामाजिक उपक्रमात प्रमुख भुमिका बजावत खरी समाजसेवा केली आहे. तालुक्यातील पाणी फांऊडेशनच्या वाटर कप स्पर्धेत मानवलोकचा मोठा सहभाग होता. कोरोना संकटात अनेक गोरगरीब कुटुंबांना किराणा व जीवनावश्यक वस्तूही वाटप करण्यात मानवलोकने पुढाकार घेतला आहे. एन ९५ मास्क व सॕनिटायझर वाटप प्रसंगी मानवलोक अंबाजोगाई चे जयसिंग चव्हाण, तहसीलदार व्ही. एस. शिडोळकर, नायब तहसीलदार सुहास हजारे, वैद्यकिय अधिक्षक  डॉ. चेतन आदमाने, सहा. पोलीस निरीक्षक सुरेखा धस, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे, डॉ.ताथोडे, डॉ.परवेज शेख, जेष्ठ पत्रकार अनिल महाजन, पत्रकार दिनेश कापसे, अतुल शिनगारे, सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदीश तोष्णीवाल, कायाकल्प सचिव विश्वानद तोष्णीवाल, जलदुत विजय शिनगारे हे उपस्थित होते.

Exit mobile version