BEED24

आ.बाबाजानी दुर्राणी कोरोना पॉझिटीव्ह

औरंगाबादःदि.१८- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषद आमदार बाबाजानी दूर्राणी (पाथरी, जि.परभणी) यांचा औरंगाबाद येथे रँपी अँटीजन्स किटवर पाँझीटीव्ह रिपोर्ट आला आहे.

औरंगाबाद येथे खाजगी रूग्णालयात उपचार सूरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी आ. दुरार्णी यांच्या संपर्कात आलेल्यांनी प्रशासनास संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह आढळून येणारी आ.दुर्राणी हे पहिलेच लोकप्रतिनिधी आहेत.

आ.दुर्राणी यांचे आवाहन

प्रिय सहकाऱ्यांनो,
सर्दी, ताप असल्या कारणाने मी कोविड-१९ ची टेस्ट केली असता कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे कळले. औरंगाबाद येथील रुग्णालयात मी उपचार घेत आहे, आता माझी प्रकृती एकदम स्थिर असून कोणीही काळजी करू नये. आपल्या सर्वांचे असंख्य आशीर्वाद व सदिच्छा माझ्या पाठीशी आहेत, त्या जोरावर लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन परत येईल.

तुम्हा सर्वांचं प्रेम आहे, त्याबद्दल मी ऋणी आहे परंतु कोणीही मला संपर्क करण्याचा व भेटण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती. तुम्ही सर्वजण आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, विनाकारण घराबाहेर पडू नका आणि प्रशासनास सहकार्य करा.

आपला
आ.बाबाजानी दुर्राणी.

Exit mobile version