BEED24

आ.सोळंके यांनी अधिकाऱ्यांना झाडले;

किल्लेधारूर दि.२९(वार्ताहर) येथील तहसील कार्यालयात असलेल्या अस्वच्छते बाबत व विविध विभागाच्या कामावर नाराजी दाखवत आ.प्रकाशदादा सोळंके यांनी अधिकाऱ्याना चांगलेच धारेवर धरत तात्काळ आठ दिवसात सुधारणा करण्याच्या सुचना आज दि.२९ सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास   केल्या.

येथील तहसील कार्यालयात कुटूंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप कार्यक्रमासाठी आज दि.२९ सोमवार रोजी आ. सोळंके उपस्थित होते. यावेळी तहसील कार्यालयात निदर्शनास आलेल्या अस्वस्थता बाबत तहसीलदार वंदना शिडोळकर यांच्यासह अधिकाऱ्यांची आ.सोळंके यांनी चांगलीच कानउघाडणी केली. यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या आलबेल कामा बाबत व शेतकऱ्यांच्या फेरफार तक्रारी बाबतीतही आ.सोळंके यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. नगर परिषदेकडून करण्यात येणाऱ्या कामाच्या तक्रारीसह पाणी पुरवठा योजनेच्या कामा विषयी मुख्याधिकारी नितिन बागुल यांच्याकडे नाराजी व्यक्त करत तात्काळ सुधारणा करण्याची  सुचना केली.

Exit mobile version