BEED24

ई-पास बाबत शासनाचा निर्णय

मुंबई दि.८(प्रतिनिधी) शासकीय कर्मचाऱ्यांना प्रवास व शासकीय कामकाजात येत असलेल्या अडचणी पाहता सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या वाहनांना कर्तव्यावर असताना जिल्हा बंदी लागू असणार नाही व त्यांना ई-पासची गरज नसल्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दि.५ रोजी काढले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. शासनाने लॉकडाऊनचा काळ ३० जूनपर्यंत वाढवला आहे. मात्र अनेक बाबतीत शिथिलता देण्यात येत आहे. शासकीय कार्यालयात कामकाज सुरुवात होत आहे. अत्यावश्यक सेवेतील आरोग्य विभाग, पोलिस विभाग पुर्ण कार्यक्षमतेने काम करत आहे. इतर विभागाच्या कामालाही सुरुवात होत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहणे क्रमप्राप्त आहे. लॉकडाऊनच्या सुचना योग्य  प्रकारे न मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. महानगरातील कर्मचाऱ्यांना येण्या जाण्यास अडचणी येत आहेत.  यामुळे महानगरात गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडथळा येवू नये याबाबतही सुचना देण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक  सेवेतील कामकाज सुरळीत होण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना प्रवास व शासकीय कामकाजात येत असलेल्या अडचणी पाहता सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या वाहनांना कर्तव्यावर असताना जिल्हा बंदी लागू असणार नाही व त्यांना ई-पासची गरज नसल्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने क्र.करोना-२०२०/प्र.क्र.५८/आरोग्य ५ प्रमाणे  दि.५ रोजी काढले आहेत.

Exit mobile version