BEED24

उद्या रविवारी रक्तदान शिबीराचे आयोजन 

किल्लेधारुर दि.१२ (वार्ताहर) जागतीक रक्तदाता दिन व येथील दिवंगत माजी नगराध्यक्ष कँप्टन राजपालसिंह हजारी यांच्या २३ व्या स्मृतीप्रित्यर्थ बालाघाट प्रतिष्ठानच्या वतिने उद्या दि.१४ जून रविवार रोजी नगरेश्वर मंदीरात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक रक्तदाता दिनी सर्वाधिक रक्तदान होणारे हे शिबीर आहे.

रक्तदानाचे अनेक उच्चांक प्रस्थापित  केलेले हे रक्तदान शिबीर यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळत साध्या पध्दतीने संपन्न होत आहे. मराठवाड्यात सर्वाधिक रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचा विक्रम या शिबिरात नोंदवला गेला आहे. दोन वर्षापूर्वी ३३४ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याने लातूर येथील भालचंद्र रक्तपेढीची क्षमता पुर्ण झाल्याने सोलापुर येथील दमानी रक्तपेढीला पुरवठा करण्यात आला होता. दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन व माजी नगराध्यक्ष स्व.कॕ. राजपालसिंह हजारी यांच्या स्मृतीत २३ वर्षांपासुन अखंड होत असलेल्या या शिबिरात सरासरी १५० रक्तदाते नियमित या शिबीरात सहभाग घेतात. यंदा देशात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने या रक्तदान शिबीराला महत्व आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समारंभाचा कार्यक्रम टाळण्यात आला असून साध्या पध्दतीने सोशल डिस्टंट व इतर नियम पाळून रक्तदान शिबीर होत असल्याची माहिती देत रक्तदात्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बालाघाट प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी यांनी दिली.

Exit mobile version