BEED24

उपप्राचार्य प्रा. माणिकराव तट यांचं दुःखद निधन

किल्लेधारूर दि.५(वार्ताहर)  येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. माणिकराव तट (५८) यांचं आज दि.५ रोजी हैद्राबाद येथे यकृताच्या आजारावर उपचार सुरु असताना  दुःखद निधन झाले.

प्रा.डॉ. माणिकराव तट (५८) हे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून ओळखले जात. येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभागाचे ते प्रमुख होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व विवाहित मुलगी, जावाई असा परिवार आहे. ते काही दिवसांपासुन यकृताच्या आजाराने पिडित होते. त्यांच्यावर हैद्राबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मावळली.  त्यांच्या  अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर आपेगाव ता.अंबेजोगाई या त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. एस.झेड. सिरसाट यांनी दिली.

Exit mobile version