BEED24

उपायुक्त फड यांची शहरास भेट;आज २७ स्वॅब अहवालाची प्रतिक्षा

किल्लेधारूर दि.१२(वार्ताहर) काल २७ लोकांचे थ्रोट स्वॅब येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आली असुन आज रात्री त्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे. आज शहरास औरंगाबाद महसूल विभागाचे उपायुक्त विजयकूमार फड यांनी भेट देत कोविड उपाययोजनांची पाहणी केली.

शहरात गेल्या अकरा दिवसांपासून दररोज पॉझिटीव्ह रुग्ण सापडत आहेत. काल येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत २७ लोकांचे स्वॅब पाठवण्यात आले आहेत. धारूर शहरात कोरोना प्रादूर्भाव रोकण्यासाठी प्रशासनाकडून सुरू असणाऱ्या उपाय योजनाची माहिती घेण्यासाठी व त्या प्रभावीपणे राबवण्याच्या सुचना देण्यासाठी औरंगाबाद महसूल विभागाचे उपायूक्त विजयकुमार फड यांनी धारूर येथे भेट दिली. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत माहिती घेतली. धारूरच्या नागरिकांचे स्वयंशिस्तीचे कौतुक केले व रुग्ण संख्या कमी असल्याचे समाधान व्यक्त केले. या उपाययोजना पुढील कालावधीत प्रभावीपणे राबवण्या बाबत सुचना दिल्या व यंञणेच्या उपाययोजनाचे कौतूक केले. यावेळी तहसिलदार व्हि. एस. शिडोळकर, निवासी नायब तहसीलदार सुहास हजारे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितिन बागूल हे यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version