किल्लेधारूर दि.२२(प्रतिनिधी) तालुक्यातील कुंडी येथे आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व इतर असे २० स्वॕब नमुने तपासणीसाठी लातूर येथील स्व. विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आली होती. यापैकी काल उशिरा पाठवलेल्या बोडखा येथील मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती डॉ.सचिन शेकडे यांनी दिली असून उर्वरित स्वॕब चे अहवाल रात्री उशिरापर्यंत मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
मागील दोन दिवसात केज, वडवणी व किल्लेधारुर तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. यातील बहुतेक रुग्ण हे मुंबईहून परतलेली आहेत. काल आलेल्या अहवालात माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील ११ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. याच अहवालात किल्लेधारुर तालुक्यातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह होता. मुळात या रुग्णाच्या इतर कुटूंबातील व्यक्तींचा पॉझिटीव्ह रुग्णात समावेश आहे. किल्लेधारुर तालुक्यातील कुंडी येथील एका रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटूंबियातील सहा सदस्य तसेच काल दि.२१ गुरुवारी याच कुटुंबातील स्वॕब घेतलेले आठ सदस्य व तेलगाव येथील दोघांचे व बोडखा येथील एक असे एकुण १७ एका गुन्ह्यातील तीन आरोपीचे अशी २० स्वॕब पाठवण्यात आले होती. यातील बोडखा येथील सर्दी, खोकला व तापेची लक्षण असलेल्या मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर उर्वरित नमुन्यांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. आज रात्री पर्यंत उर्वरित नमुन्यांचे अहवाल प्राप्त होतिल अशी अपेक्षा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे यांनी दिली.