BEED24

एसटीकडे हळुहळु प्रवाशांचा कल वाढला

किल्लेधारूर दि.५(वार्ताहर) येथील बस स्थानकातून बसेस सुरु झाली असुन बसकडे प्रवाशी काही प्रमाणात वळत असल्याचे दिसत आहे. तर अनेक दिवसांनंतर बस स्थानकातही रेलचेल दिसुन येत आहे.

कोरोनामुळे राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचे चाक जाम झाली होती. पंधरा दिवसांपुर्वी परिवहन विभागाने बसेसच्या फेऱ्या सुरु केल्या. मात्र प्रवाशांनी पाठ फिरवल्यामुळे बसेस रस्त्यावर दिसुन येत नव्हती. आज दि.५ शुक्रवार रोजी परिवहन विभागासाठी आनंदाची बातमी दिसुन आली. प्रवाशी वर्ग हळूहळू बसकडे वळाल्याचे समाधानकारक चित्र दिसुन आले. येथील बस स्थानकातून बीड, अंबाजोगाई, माजलगाव व केजसाठी प्रवाशी तुरळक प्रमाणात दिसत असल्याने लवकरच बसेसचा प्रवास पुर्ववत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version