किल्लेधारूर दि.३१(वार्ताहर) आज बीज जिल्हा रुग्णालयातून कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीत तालुक्यातील कुंडी येथील बाधिताचा समावेश असून ग्रामस्थांनी त्याचे पुष्प देवून वाजतगाजत स्वागत केले.
जिल्ह्यातील कोरानाचा उपचार पुर्ण करुन बरे झालेल्यां १४ जनांची आज सुट्टी झाली आहे. या रुग्णांवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घेतली. माजलगावचे १३ तर धारुर तालुक्यातील एकाची आज कोरोनामुक्त होऊन रवानगी करण्यात आली. तालुक्यातील कुंडी येथे ग्रामस्थांनी या कोरोनाचा सामना करुन त्यावर मात करणाऱ्या कोरोना वीरास पुष्प देवून व हालगी वाजवून स्वागत केले. तालुक्यातून कुंडी व धारुर शहर असे दोन जन कोरोना बाधित आहेत. यापैकी कुंडी येथील व्यक्ती आज कोरोनामुक्त झाल्यामुळे तालुक्यातील एक आता एक कोरोना बाधित जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.