BEED24

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून प्रतिकार दिन साजरा

किल्लेधारूर दि.२८(वार्ताहर) आखील भारतीय किसान संघर्ष समितिने भाजप प्रणित केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी व श्रमिक विरोधी धोरणाच्या निषेधार्थ २७ मे रोजी देशव्यापी विरोधाची हाक दिली होती. त्यानूसार धारूर तालुक्यातील दहा ते बारा गाव मध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात तीव्र आंदोलन आखिलल भारतीय किसान सभा धारूर तालुका च्या वतीने कॉ. मोहन लांब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

शारिरीक आंतर पाळुन शेतकऱ्याच्या बांधावर व सर्व शेतकऱ्याच्या दारात केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी व श्रमिक विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात धारूर तालुक्यातील गांजपूर, चिंचपूर, चोरंबा, आसोला, सोनीमोहा, वाघोली व आसरडोह येथील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये कॉ. मोहन लांब, कॉ. सुसेन सिरसट, कॉ.काशिराम सिरसट, दादा सिरसट, भास्कर डापकर, संजय चोले, मधुकर चव्हाण, दिपक घवाने, खमर कादरी, दत्ता मोरे, प्रलाद दोंडे, अशोक काळे, रामभाऊ पिंगळे, शिवाजी रुपणर, कैलास चव्हाण, रवी चोले व ईतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

(आपल्या व्यवसाय, प्रतिष्ठाण, संस्था सह वैयक्तिक शुभेच्छा, वाढदिवस आदीच्या जाहिरातीसाठी संपर्क करा-९४२१९४४५६८)

Exit mobile version