बीड दि.१७(प्रतिनिधी) आज पाठवण्यात आलेल्या ५७ थ्रोट स्वॅब पैकी पाच पॉझिटीव्ह आली असून यात केजमध्ये चार तर बीड शहरातील एकाचा समावेश आहे.
आज जिल्ह्यातील ५७ जनांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. याचा अहवाल आला असून केज तालुक्यातील माळेगाव येथील मयत कोरोना पॉझिटीव्ह महिलेच्या संपर्कातील चौघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर बीड शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. जिल्ह्यात पुन्हा नवीन पाच रुग्णांची वाढ झाली असल्यामुळे ॲक्टीव्ह रुग्ण संख्या आता २७ झाली आहे.