BEED24

केज येथे रोटरी क्लबकडून इमर्जन्सी रक्तदान शिबिराचे आयोजन

केज – दि.३(प्रतिनिधी) अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे. येथील रुग्णांना रक्ताची गरज पडत आहे. ही रक्तपेढी केज व परिसरातील गरजू रुग्णासाठी वरदान आहे. या परिसरातील रुग्णांना गरज पडल्यास रक्तपुरवठा करून जीवनदान देते. याकरिता रोटरी क्लब ऑफ केज इमर्जन्सी रक्तदान शिबिर घेऊन या रक्तपेढीस सहकार्य करत असते. म्हणूनच कोरोना लॉकडाऊन संकटानंतर रोटरी क्लब ऑफ केज ने ३ जून रोजी सकाळी  ११  ते दुपारी १ या वेळेत हनुमान मंदिर वकिलवाडी येथे इमर्जन्सी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

कोणताही दिन औचित्य नसताना व कोणतीही पूर्व प्रसिद्धी नसताना केवळ एका हाकेवर केज शहरातील खालील २२  सामाजिक नायकांनी रक्तदान करून आपली सामाजिक संवेदना व बांधिलकी जपली आहे. यामध्ये अस्मिता अजय एखंडे व प्रभावती संग्राम आरकडे या दोन महिला रक्तदात्यांचा समावेश आहे. समस्त केजवासीयांच्या वतीने रोटरी क्लब ऑफ केज यांनी केजच्या २२  नायकांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहेत. आज रक्तदान केलेल्यामध्ये महेश जाजू, सलीम तांबोळी, अजय भांगे, विजय राऊत, प्रीतम जोगदंड, दयानंद देशमुख, रवींद्र क्षीरसागर, अमोल मुंडे, साजिद इनामदार, अस्मिता अजय एखंडे, रामदास कुंभार, प्रणित गिरी, प्रवीण देशपांडे, कृष्णा गायके, नरेश बोर्डे, विशाल चौरे, स्वप्नील भोसले,बाबासाहेब केदार, निलेश वाघमारे, नितीन करपे, प्रभावती संग्राम आरकडे आणि राहुल माने यांनी स्वयंस्फुर्त पणे रक्तदान केले. हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी रोटरीचे अध्यक्ष रो अरुण अंजान, संस्थापक अध्यक्ष तथा सचिव हनुमंत भोसले, प्रोजेक्ट चेअरमन रो महेश जाजू, रो दादा जमले, रो डी एस साखरे, रो प्रवीण देशपांडे यांच्यासह रोटरी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version