BEED24

केशकर्तनालय रात्रीतून केली सॕनिटाईझ

किल्लेधारूर दि.२५(वार्ताहर) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज काढलेल्या नवीन आदेशानंतर नाभिक समाजाला मोठा दिलासा मिळाला असून उद्या सुरु होणाऱ्या केश कर्तनालयास सॕनिटाईझ करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत करण्यात येत होते.

तब्बल दोन महिन्यापासून बंद असलेले केश कर्तनालय, ब्यूटीपार्लर उद्या सुरु होत आहेत. दोन महिन्यापासून व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाज अडचणीत होता. याबाबतीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही शासनाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. आज जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सुधारित आदेश जारी करत केशकर्तनालय, ब्युटी पार्लर व तत्सम व्यवसायांना सकाळी ७.३० ते सांयकाळी ६.३० पर्यंत उघडण्याची परवानगी दिली. परंतू केशकर्तनालय संपुर्ण निर्जंतूकीकरण करणे व सोशल डिस्टंटींग पाळत स्वच्छतेची सर्व नियम पाळण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे नाभिक समाजात समाधान व्यक्त करण्यात येत असून शहरातील केश कर्तनालय रात्रीतून निर्जंतूकीकरण (सॕनिटाईझ) करुन दुकाने सज्ज करण्यात आली आहेत. येथील नाभिक समाजाचे कार्यकर्ते बालाजी क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे स्वागत केले असून सर्व नियम पाळण्याची काळजी घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

Exit mobile version