किल्लेधारूर दि.२६(वार्ताहर) कै.अंबादासराव निर्मळ यांची दहावी पुण्यतिथी पारंपारिक कार्यक्रम टाळून अगदी साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली.
धारुर शहराच्या राजकारणातील किंग मेकर म्हणून ओळख असलेल्या अंबादासराव निर्मळ यांची आज दहावी पुण्यतिथी. कै. निर्मळ केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक व सराफ व्यापार क्षेत्रात नावाजलेले व्यक्तीमत्व होते. माजलगाव मतदारसंघातील अनेक गावात निर्मळ यांचे वर्चस्व होते. कै.निर्मळ यांच्या पुण्यतिथी निमित्ताने किर्तन, भजन व सार्वजनिक भोजन असा कार्यक्रम दरवर्षी साजरे केले जातात. परंतू यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करुन कै. अंबादासराव निर्मळ यांच्या स्मारकावर पुजन करुन साध्या पध्दतीने पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी राजाभाऊ निर्मळ, माधव निर्मळ, डॉ. लक्ष्मण निर्मळ, बालाजी निर्मळ, विजय निर्मळ यांच्यासह निर्मळ बंधू व कुटूंबिय तसेच कै. निर्मळ यांच्यावर प्रेम करणाऱ्यानी मुर्तीस अभिवादन करत समाधीचे दर्शन केले.