BEED24

कोरोनाचा अटकाव करण्यासाठी तात्काळ पावले उचलून सर्वसामान्यास आर्थीक मदत करा

किल्लेधारूर दि.१९ (वार्ताहर )कोरोनाचा प्रादूर्भाव रोकण्यास राज्य शासनास अपयश आले असून तात्काळ कठोर उपाययोजना करून सर्वसामान्यास राज्य शासनाने आर्थीक मदत करावी अशी मागणी भाजपाचे वतीने युवक नेते रमेशराव आडसकर यांचे नेतृत्वा खालील शिष्टमंडळाने तहसीलदाराला निवेदन देऊन करण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाने थैमान मांडले असून देशात सर्वांत जास्त रुग्ण संख्या महाराष्ट्रात आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोकण्यास राज्य शासन अपयशी  ठरले आहे. केंद्र शासन राज्यास भरीव मदत करत असताना राज्यशासन माञ प्रभावी पणे उपाययोजना करत नाही. तात्काळ कठोर उपाययोजना करून राज्यात नागरीकांना धिर द्यावा, विलगीकरण कक्षात सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात व आधार द्यावा, शेतकऱ्यांना  बिनव्याजी कर्ज पूरवठा तात्काळ करावा, शेतकऱ्यांचे कापूस व इतर धान्य खरेदी साठी आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू करावेत, स्वस्त धान्य दुकानात सर्व माल कमी किंमतीत द्यावा, स्थंलातरीत मजूर विद्यार्थी यांना त्यांचे गावात नेण्याची व्यवस्था करावी व राज्यातील सर्वसामान्या लोकांना तात्काळ आर्थीक मदत करावी अशा मागणीचे निवेदन युवक नेते रमेशराव आडसकर यांचे नेतृत्वा खालील शिष्टमंडळाने तहसीलदार वंदना शिडोळकर यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर युवक नेते रमेशराव आडसकर, नगराध्यक्ष डॉ.स्वरूपसिंह हजारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव बडे, बाळसाहेब गायकवाड, अर्जूनराव तिडके, विनायक शिनगारे, शिवाजी मायकर, दत्ताञय धोञे,ॲड. एन. बी. पांचाळ आदींच्या  स्वाक्षऱ्या  आहेत.

Exit mobile version