BEED24

कोरोनाचा आठवा बळी; मृत्यूदर चिंताजनक…. पहा कोण आहे

किल्लेधारूर दि.२(वार्ताहर) तालुक्यातील गांवदरा येथील ७१ वर्षीय वृध्दाचे अंबाजोगाई येथे कोरोनावर उपचार सुरु असताना आज दि.२ बुधवार रोजी सकाळी ६ वाजता निधन झाले. तालुक्यात आजवर ८ मृतांची नोंद झाली आहे. तालुक्याचा मृत्यूदर इतरांपेक्षा अधिक व चिंताजनक आहे.

दि.२ सप्टेंबर बुधवार रोजी तालुक्यातील गांवदरा येथील एका रुग्णावर कोरोना आजारावर उपचारासाठी अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज दि.२ बुधवार रोजी सकाळी ६ वाजता त्याचे कोविड-१९ मुळे निधन झाले. यामुळे धारुर तालुक्यातील कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता ८ झाली आहे. शहरात ४ तर तालुक्यात ४ रुग्ण कोविड-१९ मुळे दगावली आहेत. आजवर तालुक्यात १६६ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे आजवर झालेल्या मृत्यू मध्ये ६० पेक्षा जास्त वर्षांच्या वयोवृध्दांचा समावेश आहे. मयताचा दर हा साडेचार टक्क्यापेक्षा जास्त असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version