किल्लेधारूर दि.१२(वार्ताहर) डायलेसिसवर असलेल्या रुग्णाने कोरोनावर मात केल्यानंतर आज सुट्टी होवून शहरात परतताच त्याचे पुष्पवृष्टी करुन स्वागत करण्यात आले.
शहरातील कोरोना बाधित तरुणाचि आज रुग्णालयातून सुट्टी करण्यात आली. १४ दिवसानंतर कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्यावर त्याची सुट्टी झाली. असाध्य रोगावर उपचार सुरु असताना कोरोनावर विजय मिळवल्याबद्दल त्याचे कौतूक होत आहे. आज सांयकाळी सहाच्या सुमारास शहरातील निवासस्थानी त्यास कोविड १९ रुग्णवाहिकेतून आरोग्य विभागाकडून सोडण्यात आले. यावेळी शहरातील नागरीकांनी त्याचे पुष्पवृष्टी करुन टाळ्या वाजवत स्वागत केले. यावेळी स. पोलिस निरिक्षक सुरेखा धस, स.उपनिरिक्षक गोविंद बाश्टे, पो.कॉ. परमेश्वर वखरे यांच्यासह नागरीक उपस्थित होते.