BEED24

कोरोना चाचणीसाठी गेलेल्या बाबाला फुफ्फुसाचा कँसर

मुंबई :दि.१२-  संजय दत्त काही दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात दाखल झाला होता. त्याची कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आली. मात्र, त्याला श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे तो पुन्हा रुग्णालयात दाखल होता. त्यानंतर रुग्णालयातून दोन दिवसांनी त्याला डिस्चार्ज मिळाला. मात्र, आता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे.

संजय दत्त आणि त्याच्या कुटुंबियांकडून आतापर्यंत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. संजय दत्तची पत्नी मान्यता आणि दोन्ही मुलं सध्या दुबईत आहेत. संजय दत्तच्या एका जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर आहे. त्यावर उपचार होऊन तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, उपचारासाठी संजयला तातडीने अमेरिकेला जावं लागेल. काल संजय दत्तने ट्विट करुन काही दिवसांसाठी ब्रेक घेत असल्याचे सांगत चाहत्यांना लवकर बरा होण्याची प्रार्थना करावी असे आवाहन केले होते. संजय दत्त उपचारासाठी तात्काळ  अमेरिकेला जाण्याची शक्यता आहे.

Exit mobile version