किल्लेधारूर दि.२४(वार्ताहर) चंद्र दर्शनानंतर होणारी धामधूमी व घाई गडबडीवर कोरोनाचा प्रभाव स्पष्ट दिसुन आला असून उद्या साजरी होत असलेल्या ईद वरही कोरोनाचे ग्रहण दिसून येत आहे.
रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी सांयकाळी चंद्र दर्शन होते. या रात्रीस चाँद रात म्हणून ओळखले जाते. प्रतिवर्षी या चाँद रात्री मुस्लिम समाजाची दुसऱ्या दिवशीच्या ईदची धामधूम व घाई बाजारात दिसुन येते. यंदा मात्र कोरोनामुळे चंद्र दर्शन होवूनही बाजारपेठेत अवकळा दिसत आहे. ईदची पुर्व तयारी या दिवशी असते. मात्र कोरोना सकंटामुळे ईद साध्या पध्दतीने घरीच साजरी होत असल्याने आनंदावर विरजन पडल्याचे दिसून येत आहे. बाजारातही खरेदीसाठी दिसणारी झुंबड यावर्षी दिसून आली नाही.