BEED24

चार दिवसांच्या फरफटीनंतर भैय्याजी निघाले गावाकडे;

किल्लेधारूर दि.१५(वार्ताहर) उत्तर प्रदेशच्या २८ लोकांची गेल्या चार दिवसांपासून परवानगी अभावी सुरु असलेली फरफट अखेर दि.१५ गुरुवारी रात्री सुटली असून रात्री दहाच्या सुमारास परतीच्या वाटेवर निघालेले खाजगी वाहन बारा तासा नंतर इंदोर नजीक पोहोचले होते.

येथील लस्सीवाले, आईस्क्रीमवाले व पाणीपुरीवाले अशा उत्तर प्रदेशच्या ३१ लोकांनी तहसील व पोलिस प्रशासनाकडे आठ दिवसांपुर्वी परत जाण्याची परवानगी मागितली होती. शासनाने मध्य प्रदेश पर्यंत जाणाऱ्या मजूरांची राज्याच्या सिमेपर्यंत राज्य परिवहनाच्या बसेस मधून पाठवण्याची व्यवस्था केली. मात्र उत्तर प्रदेशच्या लोकांची शासनाकडून दखल घेतली गेली नाही. शेवटी दि.१४ रोजी स्वखर्चाने खाजगी वाहन करुन जाण्याची परवानगी मागण्यात आली. या परवानगीसाठी त्यांना २६ तास प्रतिक्षा करावी लागली. याकाळात त्यांनी ठरवलेले वाहनाने सोडण्यास नकार दिला. दुपारी एकच्या सुमारास

परवानगी आली मात्र वाहन नसल्याने त्रस्त भैय्यासमोर नवीन वाहन व नवा परवाना असा प्रश्न उपस्थित झाला. यावर पत्रकार सय्यद शाकेर यांनी नवीन वाहन उपलब्ध करुन पर्याय देवून तहसीलदार वंदना शिडोळकर व नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांच्या मदतीने सायंकाळी परवाना मिळवला. सुसाट वारा व पाऊसाने सवड देताच रात्री दहाच्या सुमारास उत्तर प्रदेशकडे रवाना झाले. रामकेस पाल यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरील वाहन सध्या इंदोरपर्यंत पोहोचले होते.

Exit mobile version