BEED24

चोरांबा येथे ७० कुंटूबाना जिवनावश्यक वस्तूचे वाटप

किल्लेधारूर दि.२०(वार्ताहर ) तालूक्यातील चोरांबा येथे गरीब व गरजू कुंटूबांना माजी सरपंच बालासाहेब भागवत चव्हाण यांनी ७० कुंटूंबाना जिवनावश्यक वस्तूचे वितरण करण्यात आले. यांची सुरूवात मान्यवराचे उपस्थीतीत करण्यात आली.

सध्या कोरोनाचे संकटा मुळे सर्व व्यवस्था ढासळल्या आहेत. मजूराचा हात बंद झाल्याने त्यांचे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परीस्थीतीत या कुंटूंबाना मदतीची गरज आहे. चोरांबा येथील ७० कुंटूबाना जिवनवाश्यक वस्तूचे किट वितरण करण्यात आले व दैंनदीन उपयोगात येणाऱ्या वस्तू या किट मध्ये देण्यात आल्या. वितरण करताना सरपंच मल्हारीराव भालेराव, तालूका खरेदी विक्री संघाचे प्रभारी चेअरमन रमेश चव्हाण, अंकुश चव्हाण, गणेश चव्हाण, हानुमंत मुळे, ग्रामपंचाय सदस्य प्रभाकर फुटाने, हारीदास जाधव, उमेश चव्हाण यांचे हस्ते किट देऊन या मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. प्रत्येक भागातील गरजू गरीब कुंटूंबाची नावे काढून त्यांना वितरीत करण्यात आले. या कुंटूंबाना आधार देण्याचे काम यांनी केले आहे. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Exit mobile version