BEED24

जिल्हा हादरला; आज १३ पॉझिटीव्ह

बीडः जिल्हयातील आज एकूण २८८ व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यात एकुण १३ जनांचे पॉझिटीव्ह अहवाल आले असल्याने बीड जिल्हा हादरला आहे. एवढ्या  मोठ्या संख्येने पॉझिटीव्ह रुग्ण सापडण्याची ही पहिली वेळ आहे. आज धारुरचे सर्व निगेटिव्ह आले असुन परळीत मात्र पाच पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली आहे. याशिवाय बीड, आंबाजोगाई व आष्टीत पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत.

आजच्या स्वॅब अहवालांत पॉझिटीव्ह आलेल्या  रुग्ण संख्या पुढील प्रमाणे आहे.

आज 13 पॉझिटिव्ह
आजचे स्वॅब – 288
निगेटिव्ह – 273
अनिर्णित – 02
*02* देवीलिमगाव ता आष्टी – 04 वर्षीय पुरुष, 08 वर्षीय स्त्री
*03* -बीड शहर-63, 78 वर्षीय पुरुष , 60वर्षीय स्त्री
*05* -परळी शहर – 29, 20, 25 ,वर्षीय पुरुष,50,52 वर्षीय स्त्री
*03*- अंबाजोगाई-38, 22, 30 वर्षीय पुरुष

Exit mobile version