BEED24

जिल्ह्यात पुन्हा ५ पॉझिटीव्ह; पाटोद्यात चार

बीड दि.२१(प्रतिनिधी)आज पाठविलेल्या ३१ स्वॅब पैकी २३ निगेटिव्ह तर ५ अहवाल पॉजिटिव्ह आली आहेत तर ३ प्रलंबित असल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचे मीटर वाढतच असून आज सलग दुसऱ्या दिवशीही पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.

पाटोदा येथील माळी गल्लीत चार पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. यात पाटोदा अकरा वर्षीय मुलीसह ३० वर्षे वयाची महिला व सात वर्षीय मुलासह व ३३ वर्षे पुरूषाचा समावेश आहे. तर शहेनशहा नगर, बीड येथील एका २५ वर्षे वयाच्या तरुणालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनाचे मीटर सुसाट असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Exit mobile version