किल्लेधारूरः दि.२०;आगस्ट- काल पाठवलेल्या ३९ अहवाला पैकी ४ जनांचे व ॲन्टीजन टेस्टमध्ये केजचा रहिवासी असलेला होमगार्ड १ व बीडचा रहिवासी असलेला १ रुग्ण असे ६ व केज येथील ॲन्टीजन टेस्टमध्ये धारुरचा १ अशा एकुण ७ जनाचे अहवाल पॉझिटीव्ह आली आहेत. जिल्ह्यातील पाच लॉकडाऊन असलेल्या शहरात आज तिसऱ्या दिवशी करण्यात आलेल्या ॲन्टीजन टेस्ट मध्ये २४८ व्यापारी पॉझिटीव्ह आली आहेत.
आज शहरातील ४ तर अंजनडोह येथील १ अशा ५ रुग्णांची भर तालुक्यात पडली आहे. इतर दोन पैकी एक केज तर एक बीड तालुक्यातील आहेत. काल आलेल्या एका पॉझिटीव्ह अहवालामुळे दिलासा मिळाला होता. जिल्ह्यातील पाच लॉकडाऊन असलेल्या शहरात सुपर स्प्रेड असलेल्या व्यापाऱ्यांची ॲन्टीजन टेस्टचा आज शेवटचा तिसरा दिवस होता. या ॲन्टीजन टेस्ट मध्ये अंबाजोगाई शहरात १६८३ पैकी ३८, आष्टीत ६६३ पैकी २०, केज मधील ७६८ पैकी १८, माजलगाव ४२५ पैकी ६२, परळी २०३९ पैकी १०० अशा एकुण ५८७७ पैकी २४८ व्यापारी पॉझिटीव्ह आली आहेत. काल धारुर मधून ३९ लोकांचे थ्रोट स्वॅब तपासणीला पाठवण्यात आली होती. यापैकी ४ पॉझिटीव्ह आली आहेत. यात तालुक्यातील अंजनडोह येथील एक नवीन प्रवासी रुग्ण पॉझिटीव्ह तर १ जन केज येथील ॲन्टीजन टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आढळली आहेत. आज आलेल्या पॉझिटीव्ह रुग्णात धारुरमधील आश्रमातील ३ सहवासितांचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या वतीने सदरील रुग्णाच्या संपर्काचा शोध सुरु केला आहे. येथील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. रात्री उशिरा बाहेरुन येणाऱ्या पोर्टल वरील नोंदीनुसार संख्येत बदल होवू शकतो.