BEED24

डॉ.एकनाथ मुंडे यांची पुणे मराठी ज्योतिष मंडळाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- येथील प्रसिद्ध डॉक्टर व.ज्योतिष डॉ. एकनाथ मुंडे यांची नुकतीच मराठी ज्योतिष मंडळ पुणे, या प्रादेशिक संस्थेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. डॉ.एकनाथ मुंडे यांचे सर्व स्तरातून देखील त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मराठी ज्योतिष मंडळ, या प्रादेशिक संस्थेच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी बीड येथील प्रसिद्ध डॉक्टर व ज्योतिषी श्री एकनाथ मुंडे यांची निवड करण्यात आली आहे. सदरची निवड संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक ज्योतिषाचार्य प्रदीप पंडित, पुणे यांनी केली आहे. सदर संस्था सर्व महाराष्ट्रात धर्म, संस्कृती, ज्योतिष् प्रसार करण्याचे तसेच सर्व मराठी ज्योतिष बंधु, भगिनींचे संगठण करण्याचे कार्य करणार आहे. पुढील काळात ज्योतिष शिक्षण, एक दिवसीय कार्यशाळा, ज्योतिष मेळा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, ज्योतिष सम्मेलन इ कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. डॉ. एकनाथ मुंडे यांच्या ज्योतिष अभ्यासक म्हणून बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध आहेत. तसेच वैद्यकीय व्यवसाय देखील ते गोरगरीबांची सेवा प्रामाणिकपणे करीत असतात, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, गेल्या पाच वर्षांपासून ते नाथ्रा येथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन सुंदर प्रकारे करतात तसेच साहित्य रसिकांची प्रचंड उपस्थिती असते ; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा संम्मेलनात झाला गौरव करण्यात येतो. या सर्व कार्याची दखल घेऊन बीड जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे. डॉ.मुंडे हे आरोग्य, ज्योतिष , शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक तसेच साहित्य क्षेत्रातील भरीव कार्यामुळे त्यांना आतापर्यंत अनेक सामाजिक संस्थांनी विविध क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन ही निवड जाहीर करण्यात आली आहे. मराठी ज्योतिष मंडळ, या प्रादेशिक संस्थेच्या माध्यमातून माझी निवड करण्यात आली आहे. या निवडीची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळून बीड जिल्ह्यात मंडळाचे कार्य वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे असल्याचे नवनिर्वाचित बीड जिल्हाध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे यांनी सांगितले. डॉ. एकनाथ मुंडे यांचे ज्योतिष क्षेत्रातील, साहित्य, आरोग्य, शैक्षणीक, सामाजिक, राजकीय क्षेञातील मान्यवर, मित्र परिवार व नातेवाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे.

Exit mobile version