BEED24

तालुक्याचे सुपुत्र पोलीस अधिकारी अशोक नखाते यांनी अनोख्या पद्धतीने नवदाम्पत्यास दिल्या नाशिक मध्ये शुभेच्छा

किल्लेधारूर दि.३० (वार्ताहर)धारुर तालुक्यातील हसनाबाद येथील सुपुत्र कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अशोकराव नखाते हे सध्या नाशिक शहर येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. नाशिक शहरामध्ये व्हिडीओ कॉन्फ्रसिंग द्वारे झालेल्या विवाहात त्यांनी नववधूस अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.

कोरोना या साथीच्या रोगामुळे शहरांमध्ये गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.
नाशीक शहरात पोलीस अधिकारी असणारे अशोक नखाते यांना नाशीक शहरात अशोका मार्ग येथे विवाह होत असल्याचे समजले. ते त्या स्थळी गेल्या नंतर तेथे शहरातील वधू हरिणी जोशी आणि निकुंज हा वर गुजरातचा मुलगा आहे. विवाह साठी गुजरात सरकारने एकट्यालाच परवानगी दिली म्हणून नवरा मुलगा एकटाच आला होता. तो एकटा आणि मुलीच्या घरचे एवढेच होते. घरातच लग्न लावले. तेथे नखाते हे गेल्या वर परिस्थिती कळाली. त्यांनी अनोख्या पध्दतीने शुभेच्छा दिल्या. त्याच्या घरचे आणि तिचे सर्व नातेवाईक व्हिडिओ कॉफरन्सिन ने लग्नात सहभागी झाले होते. यावेळी पोलीस अधिकारी अशोक नखाते यांचे सोबत पोलिस निरिक्षक रोहकाले, मुदगल आणि मुंबई नाका चे अधिकारी होते. या वधू-वरांनी घरांमध्येच विवाह केला व विवाहासाठी गर्दी केली नाही व स्वतःच्या घरामध्ये विवाह संपन्न केला. कोरोना लढाईत हा आदर्श विवाह पाहून पोलीस अधिकारी अशोक नखाते यांनी वधू वरास शुभेच्छा देऊन दोन्ही कुटूंबाचे कौतूक केले. त्यांचा विवाह हा समाजा पुढे आदर्श निर्माण करणारा व प्रशासनास कोरोना लढाईत मदत करणारा होता.

Exit mobile version