BEED24

तालुक्यात तुर, हरभरा शासकीय खरेदी केंद्र आज पासुन चालु होणार

किल्लेधारूर दि.२९ ( वार्ताहर) धारूर तालुक्यातील तुर, हरभरा  शासकीय खरेदी केंद्राचा शुभारंभ आज गुरूवार पासुन होणार असल्याची माहिती खरेदी विक्री संघाचे सचिव एम एम चोले यांनी देत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपले तुर, हरभरा शासकीय खरेदीवरच विक्रीस आणावा असे आवाहन ही चोले केले.

यासंदर्भात माहिती देताना धारूर तालुका खरेदी विक्री संघाचे सचिव एम एम चोले यांनी सांगितले की, धारूर तालुक्यातील तुर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या पीकाची यापुर्वीच खरेदी विक्री संघाकडे नोंदणी केलेली आहे. या खरेदी केंद्रावर एफ सी आय कडुन शासकीय तुर व हरभरा खरेदी केले जाणार असल्याचे सांगत चोले यांनी ही खरेदी केंद्र चालु करण्यासाठी खुप उशिर झाल्याचे सांगत आपल्या खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या मालाची ग्रेडींग करण्यासाठी ग्रेडर उपलब्ध नसल्याने त्यातच कोरोना व्हायरसमुळे लाॅकडाऊन जाहिर केल्याने या खरेदीस उशिर झाल्याची कबुली दिली. आता आपल्याला ग्रेडर उपलब्ध झाला असल्याने गुरूवार दि.३० एप्रिल पासुन धारूर येथील खरेदी विक्री संघाच्या शासकीय खरेदी केंद्र चालु होत आहे. तुर व हरभरा पीकाची नोंदणी प्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ठरवुन दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. जसे सोशल डिस्टटंन्स, माल घेऊन आलेल्या शेतकरी तसेच येथील कर्मचारी यांच्या तोंडाला मास्क, सॅनेटायझर आदिची पुर्तता करून कोणतीही गर्दी होणार नाही याची दक्षता घेत पहिल्या दिवशी दहा शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यात येणार आसल्याचे ही चोले यांनी सांगितले. पुर्वी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचाच माल नोंदणी प्रमाणे खरेदी केला जाईल. यात केज व धारूर दोन तालुक्यातील सहा तीनशे तुर उत्पादक शेतकऱ्यांनी तर तीन हजार पाचशे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तरी तालुक्यातील तुर, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल खाजगी व्यापाऱ्यांना न देता शासकीय खरेदी केंद्रावरच आणुन सहकार्य करावे. असे आवाहन ही एम एम चोले यांनी केले.

नोंदणीचा कालावधी वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी

वारंवार मागणी केल्यावर अखेर आज गुरूवार पासुन धारूर तालुक्यातील तुर व हरभरा पीकाची शासकीय खरेदी केंद्र चालु होणार आहे. यासाठी शासनाने जाचक अटींची अट लादली होती. त्यामुळे त्या अटींची पुर्तता करताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येत होते. त्यातच कोरोनामुळे लाॅकडाऊन जाहिर झाल्याने तालुक्यातील अनेक तुर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या पीकाची नोंदणी करता आली नाही. त्यात पुर्व नोंदणी करण्यासाठी ३० एप्रिल शेवटची तारीख आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करावयाची आहे. तरी शासनाने तुर व हरभरा पीकाची विक्री करण्यासाठी नोंदणी कालावधीला मुदत वाढ देण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Exit mobile version