BEED24

त्या कोरोनाग्रस्त तरुणाचा मृत्यू

बीड– जिल्ह्यात तीन दिवसांपुर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला होता. या तरुणाचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनामुळे मयत झालेल्याचा आकडा सहा झाला आहे.

अंबाजोगाई येथे आपल्या भावाकडे भुम तालुक्यातील गिरवली जि.उस्मानाबाद येथून आलेल्या तरुणाला गेल्या तीन दिवसांपुर्वी कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्रास होत असल्याने या तरुणास अंबाजोगाई येथील स्वा.रा.ति. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यास पॉझिटीव्ह असल्याने अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. आज उपचारा दरम्यान प्रकृती बिघडून त्याचे निधन झाले. यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मयत झालेल्यांची संख्या सहा झाली आहे.

Exit mobile version