BEED24

दारुच्या नशेत सख्ख्या भावाचा खून

दिंद्रुड दि.३१(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील  माजलगाव तालुक्यात दिंद्रुड पोलिस हद्दीत सख्ख्या भावाने लहान भावाचा दारुच्या नशेत खून केल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

दिंद्रुड पोलिस हद्दीतील पिंपळगाव ना. येथील गजानन दशरथ काळे व लक्ष्मण दशरथ काळे हि भावंड राहतात. दारुच्या नशेत नेहमीच वाद होत होते. शनिवारी रात्री मयत लक्ष्मण वय २८ वर्षे याचा मोठा भाऊ गजानन यांनी एकमेकास हाणामारी करतांना डोक्यात मोठी जखम झाल्याने मयत लक्ष्मण याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेनंतर दिंद्रुड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

Exit mobile version