किल्लेधारूर दि.३(वार्ताहर) गेल्या ३ दिवसा पासुन धारुरकरांना दिलासा मिळत आहे. काल पाठवलेली १७ स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे कोरोनाचा वेग मंदावला असल्याचे दिलासादायक स्थिती आहे. परंतु तालुक्यात दोन जन ॲन्टीजन चाचणीत पॉझिटीव्ह आढळली आहेत.
शहर व तालुक्यात सतत कोरोना पॉझिटीव्ह येणाऱ्यांची संख्या दररोज दिसुन येत होती. दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांमुळे लोकांत चिंतेचे वातावरण होते. परंतू गेल्या तीन दिवसात आढळून येणारी पॉझिटीव्ह रुग्ण संख्या कमी झाल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. काल येथील कोविड केअर सेंटरमधून १७ स्वॅब पाठवण्यात आली होती. हि सर्व अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे धारुरकरांना दिलासा मिळाला आहे. आज पुन्हा ३२ स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. आज शहरातील कुंभारवाडा येथील एक स्त्री व तालुक्यातील कारी येथील एक पुरुष ॲन्टीजन चाचणीत पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. रात्री उशिरा येणाऱ्या अहवालात इतर ठिकाणाहून तालुक्यातील रुग्ण नोंदवली गेल्यास आजच्या संख्येत वाढ होईल.