BEED24

दिलासादायक बातमी; कोरोनाचा वेग थंडावला…?

दिल्ली दि.२(एबीपीएन) जगात थैमान घातलेल्या कोविड १९ वायरसचा वेग थंडावला असल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने प्रसारीत केली असुन यामुळे जागतिक पातळीवर मोठा दिलासा मिळाला असल्याचे सांगण्यात आले.

नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वप्रथम चीनच्या वूहानमध्ये कोरोना संसर्ग आढळून आला. बघता बघता या कोरोनाने अख्ख्या जगात थैमान घातले. तब्बल सात महिन्यानंतर वूहानमध्ये १ जून सोमवारी एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. तर इटलीच्या मिलानमध्येही हा आकडा निरंक होता. जागतिक स्तरावर रुग्णात सुधारणा होण्याचा रिकवरी रेट ३८.१९ टक्के होता. तो आता ४८.०१ असा झाला असल्याने कोरोना संसर्गाचा वेग मंदावला असल्याचे दिसत आहे. भारतातही रिकव्हरी रेट ५० टक्क्यावर आला आहे. याबरोबरच या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूदरातही मोठी घसरण झाली आहे. ३.१ टक्क्यावर असणारा मृत्यूदर सोमवारी २.८ वर आला आहे. इटलीमध्ये या रोगामुळे ३५ हजार जनांचा मृत्यू झाला होता. त्या इटलीचा सोमवार हा दिवस निरंक राहिला. यामुळे कोरोनावर जग मात देण्यात यशस्वी होत असल्याची दिलासादायक बातमी वृतवाहिनीवर प्रसारीत झाली आहे. मात्र जागतिक स्तरावर रुग्णसंख्येच्या रांगेत भारत सातव्या स्थानावर पोहोचला असून जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप कोरोनावर मात झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.

Exit mobile version