BEED24

दुधिया गल्लीत शिथिलता

किल्लेधारूर दि.४(वार्ताहर) धारुर शहरात दुधिया गल्लीत एक पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यामुळे लावण्यात आलेली संचारबंदी १४ दिवसात कसलेही लक्षणे आढळून आली नसल्याने कन्टेन्मेंट मुक्त झाल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशानुसार आज दि.११ संचारबंदी हटविण्यात आली आहे.

या प्रतिबंधात्मक क्षेत्रात १४ दिवसात एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आला नसल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड यांनी शिथिलता देण्याची विनंती केली. यामुळे आज दि.११ गुरुवार रोजी नवीन आदेश जारी करत या गावातील संचारबंदी हटवण्यात आली आहे. तसे आदेश येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे यांना प्राप्त झाले असून शहरात आता संपुर्ण भागात शिथिलता राहणार आहे.

Exit mobile version