BEED24

दुसऱ्या दिवशीही पॉझिटीव्ह संख्या ८…. पहा कुठले आहेत रुग्ण….

किल्लेधारूर दि.२४ सप्टेंबर- आज धारुर कोविड सेंटरमध्ये केलेल्या ४४ ॲन्टीजन तपासणीत ८ जन पॉझिटीव्ह आली आहेत. यात धारुर शहरातील केवळ दोन जनांचा तर ग्रामीण भागातील ६ जनांचा समावेश आहे. काल पाठवलेल्या ८ स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज वडवणी येथील दोघांना धारुर कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आज तालुक्यात ८ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली आहे. येथील कोविड केअर सेंटरमध्ये ४४ जनांची ॲन्टीजन चाचणी करण्यात आली. यात ८ जनांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. काल येथील कोविड सेंटर मधून पाठवण्यात आलेल्या ८ स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आली आहेत. शहरातील संख्या समाधानकारक असली तरी ग्रामीण भागात वाढणारी संख्या चिंताजनक आहे. वडवणी येथे पॉझिटीव्ह आढळलेल्या दोघांना आज येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ॲन्टीजन तपासणीतील पॉझिटीव्ह

१. ३५ वर्षीय स्त्री, डोंगरवेस, धारुर

२. ४५ वर्षीय पुरुष, देवदहीफळ, ता.धारुर

३. ७० वर्षीय स्त्री, गायकवाड गल्ली, धारुर

४. ४० वर्षीय, पुरुष, पहाडी पारगाव , ता.धारुर

५. २५ वर्षीय पुरुष, तेलगाव, ता.धारुर

६. ४५ वर्षीय स्त्री, तेलगाव, ता.धारुर

७. ४१ वर्षीय पुरुष, गोपाळपुर, ता.धारुर

८. ३१ वर्षीय पुरुष, मैंदवाडी, ता.धारुर

यांचा समावेश आहे.

Exit mobile version