BEED24

धक्कादायक; अंबाजोगाईत सलग तिसऱ्या दिवशीही कोरोना बळी…

अंबाजोगाई दि.२८(प्रतिनिधी) अंबाजोगाईत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असताना मृत्यू होण्याच्या घटना रविवार, सोमवार व मंगळवार अशा सलग तिसऱ्या दिवशी झाल्याचे उघड होत असून काल माजलगाव तालुक्यातील  दोघांवर येथील संत रविदास  स्मशानभूमीत नगर परिषदेच्या वतीने सन्मान पूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले. यातच आज परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील ६६ वर्षीय महिलेचा अंबाजोगाई येथे सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाकडून मात्र अद्याप याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

चार दिवसा पूर्वी २ कोरोना बाधित व्यक्तीच्या अंत्यविधिवरुन चार ठिकाणच्या नागरिकांनी त्या कोरोना बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यास विरोध दर्शवल्या मुळे अंबाजोगाई शहर बरेच चर्चेत आले होते. माणुसकीचे दर्शन घडवत शहरातील संत रविदास सामाजिक संघटनेने या पुढें कोरोना बधितांचा अंत्यविधी करण्यासाठी शहरातील दासोपंत मंदिरा नजीक रेणुका देवी रोड वर असलेल्या श्री संत रविदास मोची समाज स्मशानभूमीत करण्याची लेखी संमती नगर परिषदेला दिल्यानंतर कोरोना बधितांचा अंत्यविधी या पुढे संत रविदास स्मशानभूमीतच होणार असल्याचे मुख्याधिकारी सुधाकर जगताप यांनी जाहीर केले होते. रविवार पासून कोरोना उपचारा दरम्यान मृत्यू पावण्याच्या घटना सलग तिसऱ्या दिवशीही सुरुच आहेत. काल याच स्मशानभुमीत दोघांवर अंत्यविधी करण्यात आला होता. आज दि.२८ मंगळवार रोजी सकाळी एक जन दगावला असल्याची माहिती समोर आली आहे. परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील ६६ वर्षीय महिलेचा अंबाजोगाई येथे सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे कळते. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या आता २७ वर गेली आहे.

कृपया बातम्या जास्तीत जास्त शेअर करा….

Exit mobile version