BEED24

धक्कादायक; जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या वाढली.

बीडः बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसां पासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने  वाढत असताना धक्कादायक बाब समोर येत असून जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढल्याचे दिसत आहे. गेल्या ४८ तासात जिल्ह्यातील तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोना बळींची संख्या दहा झाली आहे. तर कोरोनाच्या भितीमुळे एकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे.

दि.११ शनिवार रोजी जिल्ह्यातील विविध कारणांनी तीन जनांचा मृत्यू झाला आहे. पाटोदा तालुक्यातील येवलवाडी व बेलसूर येथील दोघांचा पुणे येथे कोरोनावर उपचार सुरु असताना तर गेवराई तालुक्यातील  उमापुर येथील एका रुग्णाचा बीड जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर चकलंबा येथील तरुणाने कोरोंटाईन असताना कोरोनाच्या भितीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. गेल्या ४८ तासात तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरु असताना तर एकाने कोरोनाच्या भितीने जीव गमावला आहे. आत्महत्या वगळता जिल्ह्यात कोरोना बळीची संख्या दहा झाली आहे.

Exit mobile version