BEED24

धक्कादायक पती कोरोना पॉजिटिव्ह आढळ्याने पत्नीचा मृत्यू…. तालुक्यात अजून दोन रुग्णांची वाढ; आजची संख्या ६

किल्लेधारूर दि.२५ (वार्ताहर)तालुक्यातील गांवदरा येथील ६० वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सोमवारी (दि.२४) रात्री आरोग्य विभागाने उपचारा साठी नेले. याचा धक्का बसलेल्या ५८ वर्षीय पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना धारुर तालुक्यातील गावंदरा येथे आज सकाळी उघडकीस आली. संध्याकाळी आलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत रात्री २ ने वाढ होत संख्या ६ झाली आहे.

धारूर तालुक्यातील गावंदरा येथील कुसाबाई बडे (वय ५८) यांच्या पतीचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने व गंभीर लक्षणे आढळल्याने आरोग्य विभागाने त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल केले. पती कोरोनाग्रस्त आढळल्याचा व रुग्णालयात नेल्याचा धक्का कुसाबाई बडे यांना बसला. त्यानंतर त्या दु:खात आणि भीतीच्या छायेखाली होत्या. मंगळवारी (दि.२५) घरातील लोकांनी त्यांना झोपेतून उठविण्याचा प्रयत्न केला, पण त्या मृत अवस्थेत आढळल्या. पतीला कोरोना झाल्याच्या धक्क्यातून आणि भीतीने त्यांचा मृत्यू झाल्याची शंका कुटुंबिय व शेजारील लोक व्यक्त करीत आहेत. बडे यांच्या कुटुंबियांचे स्वॅब घेण्यात आले असून मयताचे पती वगळता सर्वजण निगेटिव्ह आली होती. आज आलेल्या अहवालानुसार तालुक्यात रात्री अंबाजोगाई येथे उपचार घेत असलेल्या तालुक्यातील कोथिंबीरवाडी गावातील ४६ वर्षीय पुरुष व औरंगाबाद येथे दाखल झालेल्या कारी गावातील पोपळेवस्तीवरील ६० वर्षीय पुरुष पॉझिटीव्ह म्हणून पोर्टल वर नोंद झाली आहे. यामुळे आजची धारुर तालुक्याची पॉझिटीव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या ६ झाली आहे.

Exit mobile version