BEED24

धारुरचे मीटर मंदावले…. आज आले येवढे पॉझिटीव्ह

किल्लेधारूर दि.१(वार्ताहर) गेल्या ३२ दिवसानंतर आज धारुरकरांना दिलासा मिळाला असुन काल पाठवलेली २५ स्वॅब पैकी २४ अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे कोरोनाचा वेग मंदावला असल्याचे दिलासादायक स्थिती दिसत आहे.

शहर व तालुक्यात ३२ दिवस कोरोनाचा कहर दिसुन आला. दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांमुळे लोकांत चिंतेचे वातावरण होते. काल येथील कोविड केअर सेंटरमधून २५ स्वॅब पाठवण्यात आली होती. यातील २४ अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे धारुरकरांना दिलासा मिळाला आहे. आज पुन्हा ३८ स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. आज अनंत चतुर्दशी दिवशी किती पॉझिटीव्ह रुग्ण येणार याची प्रतिक्षा होती. मात्र आज गायकवाड गल्लीतील एक ४५ वर्षीय पुरुष एकच रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने दिलासा मिळाला आहे. तुर्त आज तरी धारुरचा वेग मंदावला असल्याचे दिसत आहे.

Exit mobile version