BEED24

धारुरच्या “त्या” २३ थ्रोट स्वॅबची….

किल्लेधारूर दि.१५(वार्ताहर) दि.१३ रोजी शहरात आढळून आलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या जवळच्या संपर्कात आलेल्या २३ लोकांचे थ्रोट स्वॅब तपासणीला पाठवण्यात आली आहेत. दि.१४ मंगळवार रोजी यांचे अहवाल प्राप्त होणे  अपेक्षित असताना अद्याप पर्यंत अहवाल उपलब्ध नसल्याने धारुरच्या “त्या” २३ थ्रोट स्वॅबची सर्वांचीच उत्सूकता  व उत्कंठा वाढली आहे.

पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या सहवासितांना लागण होवून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे सध्या दिसत आहे. धारुर शहरात गेल्या आठवड्यात तीन रुग्ण आढळून आली आहेत.  या रुग्णाच्या अतिजवळचा संबंध आलेल्या २३ जनांचे थ्रोट स्वॅब दि.१३ सोमवारी पाठवण्यात आली आहेत.  अहवाल मंगळवारी संध्याकाळी येणे अपेक्षित होते. मात्र बुधवारचा दिवस उजाडला असतानाही अहवाल आले नसल्याने लोकांत भितीयुक्त उत्सूकता दिसुन येत आहे.

Exit mobile version